राज्यात कोरोनाचा उद्रेक, आज कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ

आज या वर्षातली सर्वात मोठी वाढ 

Updated: Mar 17, 2021, 09:14 PM IST
राज्यात कोरोनाचा उद्रेक, आज कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ title=

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज या वर्षातली सर्वात मोठी वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं पुन्हा अधोरेखीत झालं आहे. वारंवार आवाहन करुन देखील लोकांमध्ये निष्काळजीपणा कायम आहे.

राज्यात वाढत्या रुग्णसंख्येवर लोकांना लॉकडाऊन  नको आहे. पण लोकं नियमांचं पालन देखील करताना दिसत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांरवार इशारा देऊनही नागरिकांमध्ये कोणतंही गांभीर्य दिसत नाहीये. राज्यात अनेक भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. 

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने 24 तासात २३ हजारांचा टप्पा पार केला आहे. हा या वर्षांतील हा सर्वात मोठा आकडा आहे. आज राज्यात कोरोनाचे तब्बल 23,179 रुग्ण वाढले आहेत. तर 84 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 6,71,620 व्यक्ती होमक्वारांटाईन असून 6,738 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. पण अनेक ठिकाणी क्वारंटाईन असलेले व्यक्ती बिनधास्तपणे फिरताना दिसले होते. त्यामुळे कोरोनाचा धोका हा पुन्हा एकदा वाढत चालला आहे.

आज जळगाव, नांदेड, कल्याण-डोंबिवली, नागपूर, मुंबईसह सगळ्याच भागाता कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 

पुणे : दिवसभरात 2587 रुग्णांची वाढ
पिंपरी चिंचवड : आज 1248 रुग्ण आढळले आहेत.
अकोला : 24 तासात कोरोनाचे 470 नवीन रुग्ण, तर 6 रुग्णांचा मृत्यू.
चंद्रपूर: गेल्या 24 तासात 164 नव्या रुग्णांची नोंद
कल्याण डोंबिवली : सर्वाधिक 593 रुग्णांची नोंद. 
जालना :  कोरोनाचे नवे ५५२ रुग्ण, तर 4 रुग्णांचा मृत्यू
अमरावती : 406 कोरोना बाधित रुग्णांची वाढ
रायगड - जिल्ह्यात दिवसभरात 307 रुग्णांची वाढ
नागपूर : सर्वाधिक 2698 नवे रूग्ण वाढले.

संबंधित बातमी : कोरोनाच्या नव्या स्ट्रेननमुळे जगाला धोका, दुप्पट वेगानं पसरतोय कोरोना