मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी कोणाची?

 उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल 

Updated: Jul 21, 2018, 11:05 AM IST
मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी कोणाची? title=

मुंबई : मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी कोणाची? याची विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केलीय. महामार्गाच्या दुरूस्तीसाठी सरकारने काय उपाययोजना केल्याची त्याची माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत. अॅडव्होकेट ओवेस पेचकर यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलीय. 

पावसाळ्यात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. येत्या गणेशोत्सव काळात मुंबईहून तळकोकणाकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात त्यावेळी इथे खड्ड्यांमुळे मोठा त्रास होणार आहे.