वाशीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड

नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वाशी रेल्वे स्टेशनजवळ एका मल्टी स्टोरी बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये शरीरविक्रीचा काळाधंदा चालत होता.

Updated: Jun 8, 2017, 06:11 PM IST
वाशीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड title=

नवी मुंबई : नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वाशी रेल्वे स्टेशनजवळ एका मल्टी स्टोरी बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये शरीरविक्रीचा काळाधंदा चालत होता.

पोलिसांनी इथून तीन महिलांना अटक केली आहे. याशिवाय तीन मुलींचीही सुटका केली आहे. सुटका केलेल्या मुलींचं वय १६, १९ आणि २५ वर्ष आहे. 

यातील एक मुलगी १६ वर्षांची आहे, तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे, यातील १९ वर्ष मुलीचा नुकताच साखरपुडा झाला होता, मी एका बॉलीवूड दिग्दर्शकाची मुलगी असल्याचं ती सांगते.

यातील एक २५ वर्षाची मुलगी विधवा आहे. १६ वर्षाच्या मुलीला आईनेच सेक्स रॅकेटमध्ये ढकलल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी या प्रकरणी शकीला शेख, पुष्पलता, मार्गेटला अटक केली आहे, यांनी वाशीत घर घेऊन, शरीरविक्री सुरू केली होती.