धुळे शहरात हेल्मेट सक्ती, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

धुळे शहरात जिल्हा पोलीस प्रशासनाने अचानक लागू केलेल्या हेल्मेट सक्ती विरोधात सर्व राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाले आहेत. 

Updated: Feb 8, 2019, 04:30 PM IST
धुळे शहरात हेल्मेट सक्ती, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन title=

धुळे : शहरात जिल्हा पोलीस प्रशासनाने अचानक लागू केलेल्या हेल्मेट सक्ती विरोधात सर्व राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने धुळे शहरात हेल्मेटची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी कुठली पूर्वतयारी न करता आणि पोलीस प्रशासनाने हा निर्णय जनतेवर लादला आहे, असा आरोप होत आहे. धुळे शहर हे छोटे शहर असून अरुंद रस्ते असलेले शहर आहे. त्यामुळे हेल्मेट घालून फिरणे शहरात शक्य नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस प्रशासनाने ही हेल्मेट सक्ती तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी युवक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. 

वाहतूक शाखेने आधी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी त्यानंतर हेल्मेट सक्तीचा आग्रह धरावा असे आवाहनही जिल्हा पोलिस प्रशासनाला करण्यात आला आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, याआधी पुणे शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. पुण्यात जोरदार विरोध करण्यात आला. मात्र, वाहतूक पोलीस प्रशासनाने ही सक्ती कायम ठेवली. त्यामुळे पुण्यात आता हेल्मेट नसेल तर दंड आकरण्याबरोबरच कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी पुण्यात आतापर्यंत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे.