कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून पावसाचा इशारा

ऐन थंडीतही पाऊस पडत असल्याने बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे.

Updated: Nov 21, 2021, 07:06 PM IST
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून पावसाचा इशारा title=

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात आणि कोकणमध्ये पाऊस पडला आहे. 22 नोव्हेंबरमध्ये रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

ऐन थंडीतही पाऊस पडत असल्याने बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातही उद्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागांमध्ये उद्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

बीड, उस्मानाबाद  भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यातील उपनगरात पाऊस झाला आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला होता. 

जालना जिल्ह्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावलीय.भोकरदन तालुक्यातील जवखेडा पवार,जवखेडा दानवे, पिंपळगाव, सावखेडा,रिघोरा या परिसरात पावसानं हजेरी लावलीय. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ झालेल्या पावसानं शेती पिकांचं  काही प्रमाणात नुकसान झालंय अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.