सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात पावसानं धुमाकूळ घातला असून पावसाची संततधार सुरुच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३९ मिमी पाऊस पडला असून सर्व नदी-नाले ओसंडून वाहतायत. पावसानं उसंतच घेतली नसल्यामुळे सर्वत्र पुरसदृश्य स्थिती निर्माण झालीय. सिंधुदुर्गातल्या २७ गावांचा संपर्कही तुटला आहे.
दोडामार्ग तालुक्यातील भेड़शी पुलावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचा मार्ग बंद आहे. तर मालवण तालुक्यात मसूरे आणि बागायत या भागातही पुराचं पाणी रस्त्यावर आलंय. कणकवली तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून कासरल रस्त्यावर पाणी येऊन रस्ता बंद झाला आहे. तर कुडाळ तालुक्यातही आंबेरी पुलावर पाणी आलंय़. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पाऊस असाच कोसळणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.