औरंगाबाद शहराला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य पाऊस

औरंगाबाद शहरात पावसाचा धुमाकूळ

Updated: Sep 7, 2021, 10:27 PM IST
औरंगाबाद शहराला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य पाऊस title=

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला आज पावसाने चांगलंच झोडपलं आहे. औरंगाबाद शहरात सायंकाळी 7 पासून मुसळधार पावसाने अतिशय रौद्र रूप धारण केलं होतं. एका तासाच्या कालावधीत ढगफुटी पेक्षा जास्त वेगाने पाऊस झालाय. अर्धातासात सरासरी १६६.७५ मीमीच्या वेगाने या तीस मिनिटांच्या कालावधीत ५६.२ मी.मी पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद शहरावर ढगफुटीसदृश्य पावसाने झोडपून काढले. औरंगाबाद शहरात मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरातील वीज गायब झाली आहे.