'UPSC'परिक्षेत सोलापूरचा हर्षल भोसले देशात पहिला

एकेकाळी शाळा सोडणाऱ्या हर्षलची उल्लेखणीय कामगिरी  

Updated: Oct 27, 2019, 08:10 AM IST
'UPSC'परिक्षेत सोलापूरचा हर्षल भोसले देशात पहिला title=

सोलापूर : लहानपणी शाळेला रामराम ठोकलेल्या हर्षल ज्ञानेश्वर भोसलेनं UPSC परिक्षेत देशात पहिला येण्याचा मान मिळवा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत हर्षल अव्वल आला आहे. महत्वाचं हर्षलने पहिल्याच प्रयत्नात हे घवघवीत यश प्राप्त केलं आहे. लोकसेवा आयोगाने शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. 

अवघ्या वयाच्या ५व्या वर्षी त्याचे पित्रुछत्र गमावले होते. त्यानंतर शेती करून आईने त्याचे शिक्षण पूर्ण केले. सोलापुरातील देगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेत नववी ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. बीड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल येथे डिप्लोमा तर कराड येथील गव्हर्नमेंट कॉलेज येथे डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले.

शालेय शिक्षणाच्या सुरवातीला त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. परंतू एक वर्ष घरी बसल्यानंतर पुन्हा त्याला अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलेच नाही आणि आपल्या प्रवासाला सुरूवात केली. 

दारूच्या अतिसेवनामुळे वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याच्या आईला फक्त एवढंच माहित आहे की तिचा मुलगा देशात पहिला आला आहे. मुंबईत भाभा अणुसंधान संशोधन संस्थेत नोकरी मिळाली होती. पुण्यात ऑईल अॅनन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये सेवेत असतानाच त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षा दिली.