योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 3000 यू सेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात येतोय. तर पालखेड धरणातून सुद्धा 34 शे क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येते .भावली आणि दारणा धरणातून याआधीच विसर्ग सुरू आहे. गेल्या 72 तासापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि नाशिक तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील धरणे आता 100% भरु शकतील.
एकीकडे अशी परिस्थिती असताना नाशिक जिल्ह्यातल्या 10 तालुक्यात मात्र अजूनही गंभीर परिस्थिती आहे. दिंडोरी निफाड नांदगाव मनमाड येवला मालेगाव या सर्व तालुक्यांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा पुरवठा अद्याप झालेला नाही. तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला आपल्या पीक वाचवणेसुद्धा उघड होते. एका जिल्ह्यातली दोन भागातील ह्या विदारक परिस्थिती न शेतकरी पुरता धास्तावला आहे.