गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला फटका; प्रतितोळा दर 71 हजार रुपयांवर, तर चांदी 82 हजारांवर

Gudi Padwa 2024: उद्यापासून हिंदू धर्मातील नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. हा सण उद्या महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात येतो. तर दुसरीकडे गुढीपाडव्याला मुहूर्तावर सोनं खरेदीला मोठी मागणी असते. पण सोन्यांचे वाढते दर पाहता सोनं खरेदी करावे की नाही असा खरेदीदारांना प्रश्न पडला आहे.   

श्वेता चव्हाण | Updated: Apr 8, 2024, 10:54 AM IST
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला फटका; प्रतितोळा दर 71 हजार रुपयांवर, तर चांदी 82 हजारांवर title=

Gold Buying Muhurat on Gudi Padwa 2024 in Marathi : हिंदू नवंवर्ष म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा गुढीपाडवा. यादिवशी महाराष्ट्रात दारोदारी रांगोळी, विजयी गुढी उभारली जाते. मराठी लोकांचं नवीन वर्ष चैत्र महिन्याची ही सुरुवात असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ कार्य केले जाते. या दिवशी सोन्याची खरेदी, वाहन खरेदी, नवीन वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला मोठी मागणी असते. पण गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. भारतात सध्या लगनसराईचा काळ देखील सुरु आहेत. मात्र लग्नसराईच्या निमित्ताने सोनं खरेदी करणाऱ्यांना मात्र हा चढा दर सध्या डोकेदुखी ठरतोय. त्यातच आज म्हणजे गुढीपाडव्याच्या आधी सोनं प्रतितोळा दर 71 हजारांच्या पुढे आहे तर चांदी 82 हजारांने विकली जात आहे. परिणामी सोनं खरेदी करायचं की नाही, अशा प्रश्न खरेदीदारांना सतावत आहे. 

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच चेक करा दर. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 71,050 रुपये आहे. तर बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार चांदी 82,050 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

महाराष्ट्रातील सोन्यांचे दर

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 65,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 65,010 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 70,920 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 65,010 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 70,920 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 65,010 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 70,920 रुपये आहे. परिणामी लग्नसराईच्या तोंडावर दरवाढीची नागरिकांना झळ बसणार आहे. 

चांदीच्या दरात ही वाढ 

गेल्या काही दिवसांत चांदीचा भाव किलोमागे दीड लाख रुपयांनी घसरला असून हुपरी सिंगमध्ये मोठी मंदी आली आहे. दर वाढल्याने चढ-उतार थांबले आहेत. 5G प्रणाली आणि सौर ऊर्जा प्रणालीमध्ये चांदीची वापर वाढल्यामुळे किंमत वाढत आहे. या मंदीमुळे हजारो लोकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. भारतात चांदीची नानी, दागिने तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. हुपरी परिसरात सिल्व्हर पेंट केलेली घरे बांधली आहेत. दर वाढल्याने चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फायदा होत आहे.