मर्सिडीजपेक्षा महागडा बकरा; सांगलीत बकऱ्याची किंमत चक्क 74 लाख

मर्सिडीसपेक्षा जास्त किंमत या बकऱ्यांची आहे. सांगलीच्या आटपाडीचं ग्रामदैवत उतवेश्वर देवस्थानाची यात्रा आहे.

Updated: Nov 9, 2022, 11:30 PM IST
मर्सिडीजपेक्षा महागडा बकरा; सांगलीत बकऱ्याची किंमत चक्क 74 लाख title=

रविंद्र कांबळे, झी २४ तास, सांगली : एखाद्या साध्या बकऱ्याची (Goat) किंमत जास्तीत जास्त किती असू शकते.. 30 हजार..35 हजार..40 हजार.. पण सांगलीत (sangli) तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त किंमतीचे बकरे विक्रीसाठी आलेत. मर्सिडीसपेक्षा (Mercedes) जास्त किंमत या बकऱ्यांची आहे. सांगलीच्या आटपाडीचं ग्रामदैवत उतवेश्वर देवस्थानाची यात्रा आहे. त्यानिमित्तानं शेळ्या मेंढ्यांचा मोठा बाजार भरलाय. 

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशातून इथे बकरे विक्रीसाठी आलेत. त्यात माडग्याळ जातीच्या बक-यांची जास्त चर्चा आहे. कारण दीड लाखांपासून ते 74 लाखांपर्यंत या बक-यांची किंमत सांगितली जातेय.

दोन वर्षं कोरोनामुळे यात्रा झाली नव्हती, त्यामुळे शेळ्या-मेंढ्याचा खरेदी बाजारही नव्हता. पण यंदाच्या शेळ्या-मेंढयांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.