गजा मारणेला जामीन झाला होता, पण नंतर अटक झालीच होती, मुनगंटीवारांची सूचक प्रतिक्रिया!

 भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. 

Updated: Nov 9, 2022, 09:24 PM IST
गजा मारणेला जामीन झाला होता, पण नंतर अटक झालीच होती, मुनगंटीवारांची सूचक प्रतिक्रिया! title=

Sanjay Raut granted bail : ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत जामीनावर बाहेर आले आहेत. राऊत बाहेर आल्यावरही त्यांच्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. बाहेर आल्यावर ठाकरे गटाचं चिन्ह असलेली मशाल त्यांच्या गळ्यातील भगव्या उपरण्यावर दिसली, राऊतांच्या समर्थकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. राऊत बाहेर आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. (Trending Minister Sudhir Mungantiwar on Sanjay Raut granted bail maharashtra political update)

जमानत होणं म्हणजे याचा केसच्या निर्णयाशी संबंध नाही. साधारणत: कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेमध्ये जमानत ही होतेच. कुख्यात गुंड गजा मारणेची जमानत झाली होती मात्र रॅली काढल्यामुळे त्याला परत अटक झाली. ही प्रोसेस आहे याच्यावर भाष्य करण्यासारखं काहीच नाही. या केस संदर्भात निर्दोष मुक्तता होते तेव्हा यावर आपण प्रतिक्रिया देऊ शकतो. मात्र जमानतीवर प्रतिक्रिया देणं हे अतिशय घाईचं होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

कोणता राजकीय पक्ष म्हणून याकडे एखाद्या विशिष्ट बघण्याची गरज नाही. ही कायदेशीर प्रक्रिया आहे त्यामुळे तो राजकीय नेता असो किंवा सामान्य गुन्हेगार असो जेव्हा त्याच्या संदर्भामध्ये एखाद दोषारोप पत्र दिलं जातं. त्यानंतर त्याला विशिष्ट कालावधीनंतर जमानत होण्याची पद्धत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत जामिनावर बाहेर आल्यावर मुनगंटीवार यांनी गजा मारणेचं उदाहरण दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. मात्र यावेळी बोलताना त्यांनी खासदार नवनीत राणा, वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री केतकी चितळेचंही नाव घेतलं.