धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू

धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न एका तरुणीचा जीवघेणा ठरला. 

Updated: Aug 19, 2018, 12:00 AM IST
धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू title=

 

 
मुंबई :  धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न एका तरुणीचा जीवघेणा ठरला. नागपूरला राहणारी इंजिनियरिंगची विद्यार्थिनी मिनल पाटील ही तरुणी नागपूर – मुंबई दुरांतो एक्स्प्रेसने कल्याणला येत होती. त्यावेळी तिने रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला आणि ती प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकली.

नागपूरहून मुंबईला येत असताना रेल्वे कल्याणला थांबेल असे तिला वाटले. पण रेल्वे थांबत नसल्याचे लक्षात येताच, मिनलने चालत्या रेल्वेमधून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला आणि ती प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमधील फटीत अडकली. त्यातच मिनलचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, मिनलची रविवारी मुंबईत परीक्षा होती, त्यासाठी कल्याण येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी तिने धावत्या रेल्वेमधून उरण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.