Gautami Patil Lavani Nashik : लोकप्रिय लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil Lavani Nashik) कार्यक्रमात वाद आणि गोंधळ हे सूत्र कायम असून मंगळवारी (16 मे 2023) नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमातदेखील हुल्लडबाजी करण्यात आली. हा कार्यक्रम नाशिकच्या ठक्कर डोम येथे लावणीचा कार्यक्रम पार पडला. नवनिर्माण सेवाभावी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सगळीकडे गौतमीच्या कार्यक्रमाला गर्दी असते. मात्र नाशिकमध्ये प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला चक्क पाठ फिरवली होती. असं काय घडलं की गौतमीच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या...
सबसे कातील गौतमी पाटील...आणि गर्दी यांचे समीकरण निश्चित झाले आहे. गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होते. गौतमीचा डान्स म्हटला की कार्यक्रमात बसायला जागा नसते, म्हणून कुणी झाडीवर जाऊन बसतात तर कुणी घराच्या छतावर जाऊन गौतमीचा डान्स पाहत असतात. गौतमीच्या कार्यक्रमांना इतकी गर्दी होते की पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागतो. मात्र नाशिकमध्ये काहीसं वेगळच चित्र पाहायला मिळाले. कारण नाशिकमध्ये कार्यक्रम सुरु तर झाला पण गौतमीच्या कार्यक्रमातील खुर्च्या रिकाम्याच होत्या. अनेक प्रेक्षकांनी गौतमीच्या कार्यक्रमाला पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.
वाचा: परिस्थितीच अशी होती की जेठालालनं दीड महिन्यात घटवलं 16 किलो वजन!
नाशिकमधील ठक्कर डोम येथील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला 300 रुपये ते 2 हजार रुपयांपर्यंतचे तिकीट लावण्यात आले होते. एवढे महागडे तिकीट परवडत नसल्याने चाहते नाराज होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी कुणीच नव्हते. कार्यक्रमामधील अल्प गर्दी आणि रिकाम्या खुर्च्यांसमोरच गौतमीला कार्यक्रम उरकावा लागला.
जरी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला गर्दी नसली, खुर्च्या रिकाम्या असल्या तरी काही प्रमाणात कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्यांनी हुल्लडबाजी सुरु केली. या कार्यक्रमात एवढा गोंधळ झाला की आयोजकांना कार्यक्रम थांबवण्याचे संकेत द्यावे लागले. पण तरीही हुल्लडबाज काही ऐकायला तयार नव्हते. अखेर गौतमीच्या सुरक्षारक्षकांना या हुल्लडबाजांना चोप द्यावा लागला.
नृत्यकलाकार गौतमी पाटीलच्या0 कार्यक्रमाचे नाशिक शहरात आयोजन करण्यात आले होते.. या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना मद्यपी कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे पत्रकार गंभीर जखमी झाले. या सर्वस्वी घटनेसाठी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा. तसेच, नाशिकमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी नाशिक जिल्ह्यातील गौतमी पाटीलला पूर्णपणे बंदी घाला, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.