गौराईंचा आज पाहुणचार!...म्हणून गौराईसाठी दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य, नेमकं कारण घ्या जाणून!

Gauri Pujan 2023 Naivedya : अख्खा देश बाप्पामय झालेला आहे, अशात गणपतीपाठोपाठ घरांमध्ये गौराईंचं आगमन झालं आहे. आज गौराईंना पाहुणचार (Gauri Naivedya) केला जाणार आहे. काही भागात गौराईंना नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला जाईल. काय आहे यामागील कारणं जाणून घेऊयात.

Updated: Sep 22, 2023, 09:54 AM IST
गौराईंचा आज पाहुणचार!...म्हणून गौराईसाठी दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य, नेमकं कारण घ्या जाणून! title=
gauri pujan 2023 naivedya many places non vegetarian offerings gourais chimbora chicken vada offered for Jyeshtha Gauri

Gauri Pujan 2023 Naivedya : गणशोत्सवाची धूम सर्वत्र पाहिला मिळतेय. बाप्पाचा आगमनानंतर घरोघरी सोन्याच्या पावलांनी गौराईंचं (Gauri-Ganpati) आगमन झालं आहे. आज गौराईंना महानैवेद्य दाखविला जाणार आहे. काही भागात गौरीला मटण, कोंबडीवडे, अगदी चिंबोरी, मच्छीचं नैवेद्य (Gauri Naivedya) दाखवलं जाणार आहे. हिंदू धर्मात देवाला मासमच्छी वर्जीत असतं. अशामध्ये देवाच्या कामात गौराईंना नॉनव्हेजचं जेवण (gauri is offered non veg naivedya)  हे अनेकांना समजतं नाही. आज आपण जाणून घेण्यार आहोत काय आहेत यामागील कारणं...(gauri pujan 2023 naivedya many places non vegetarian offerings gourais chimbora chicken vada offered for Jyeshtha Gauri)

कुठे दिला जातो मांसाहारी नैवेद्य?

गौराईंचं आगमन झालं असून कोकणात (Kokan) गौराईंना नॉनव्हेज नैवेद्य दिला जातो. गौराईंच्या पहिल्या दिवशी तांदळाच्या भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि पाच भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर संध्याकाळी तिखटाचं म्हणजे नॉनव्हेज जेवण दाखवलं जातं. पौराणिक कथेनुसार माता पार्वती गौरीच्या रुपात माहेरीपणाला येते म्हणून तीन दिवस तिचे लाड केले जातात. त्यामुळे माहेरी आलेल्या पार्वती मातेला भूतगणांना मांसाहार मिळत नाही. म्हणून तिला तिखाटाचं नैवेद्य दाखवला जातो. 

असं म्हणतात की हा नैवेद्य पार्वती मातेसमोर ठेवला असला तरी तो भूतगणांचा मान म्हणजे रक्षकांसाठी ठेवला गेला आहे. गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्व जण विसरले. पण गौराई त्यांना विसरली नाही. शंकराचं भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात रहायची सवय आणि मांस आवडत असे. त्यांची अडचण गौरी समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिने करायला लावली.तर कोळी लोक चिंबोरी, मच्छीचं नैवेद्य दाखवतात. विशेष म्हणजे गपतीला नॉनव्हेज चालत नाही अशा परिस्थितीत गणपतीला परदा करुन हा नैवेद्य दाखवला जातो. 

पण इतर ठिकाणी म्हणजे विदर्भ, मराठवाड्यात महालक्ष्म्यांना सात्विक पदार्थांचा महानैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी हरसूंल, पडवळ, कथली, आंबिल, फोडणीची आंबिल, साधी आंबिल करण्याची परंपरा आहे. महालक्ष्मीला सोळा भाज्यांची भाजी केली जाते. त्याशिवाय काही ठिकाणी फुलोरा करण्याची प्रथा आहे. या फुलोरामध्ये करंजी, पाती, लाडू, अनारसे, वेणी-फणी, मोदक दाखवला जातो.