औरंगाबाद : गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या सुमारे पाच हजारांच्या घरात पोहोचली आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचं दूषित पाणी शिरल्यानं, औरंगाबादमधल्या छावणी भागात दूषित पाण्याचा पुरवठा झाला. त्यामुळे आतापर्यंत या भागात तब्बल ४ हजार ८१२ नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.
यापैकी १ हजार ४७० रुग्णांवर दवाखान्यात उपचार झाले. आज घडीला १४ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
दरम्यान डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर गॅस्ट्रोची साथ नियंत्रणात आली आहे.
छावणी परिषदेनं पाण्याचे नमूने घेतले नाहीत, त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला जातोय.