पुण्यातील कचरा प्रश्न पुन्हा पेटणार

कचरा डेपोग्रस्त ग्रामस्थ पुन्हा एकदा आंदोलनांच्या पवित्र्यात आहेत. मागील आंदोलनाच्या वेळी दिलेलं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळलं नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पुन्हा आजपासून कचरा बंदचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कचरा डेपो परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर आज महापालिककडून डेपोमध्ये कचऱ्याच्या गाड्या पाठवण्यातच आलेल्या नाहीत.

Updated: Jun 9, 2017, 02:00 PM IST
पुण्यातील कचरा प्रश्न पुन्हा पेटणार title=

पुणे : कचरा डेपोग्रस्त ग्रामस्थ पुन्हा एकदा आंदोलनांच्या पवित्र्यात आहेत. मागील आंदोलनाच्या वेळी दिलेलं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळलं नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पुन्हा आजपासून कचरा बंदचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कचरा डेपो परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर आज महापालिककडून डेपोमध्ये कचऱ्याच्या गाड्या पाठवण्यातच आलेल्या नाहीत.

कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर ग्रामस्थांनी तब्बल २३ दिवस कचरा बंद आंदोलन केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढला होता. त्यानुसार महापालिकेनं कचरा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्याच्या दृष्टीकोनातून बृहद आराखडा तयार केला आहे. मात्र त्यावर ग्रामस्थ समाधानी नाही आहेत. स्थानिकांना महापालिकेत कायम स्वरुपी नोकरी, बाधित जमिनीचा काही भाग स्थानिकांच्या ताब्यात देणे यांसरख्या मागण्या एक महिन्यात पूर्ण झालेल्या नाही. असं असलं तरी यावेळी आंदोलनात कचरा डेपोग्रस्त दोन गावांपैकी केवळ उरुळीचेच ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. फुरसंगीचे ग्रामस्थ अजूनतरी त्यापासून दूर आहेत.