राजापूर : कोकणातल्या प्रसिद्ध अशा राजापूर मधील गंगेचं आज सकाळी आगमन झालं आहे. आज सकाळी ६ वाजता राजापूर जवळच्या उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली.
दर तीन वर्षांनी या गंगेचं आगमन व्हायचं, मात्र २०१३ पासून दरवर्षी गंगेचं आगमन होत आहे. ३१ जुलै २०१६ रोजी गंगा अवतरली होती. तीन महीने गंगा होती.
त्यानंतर ७ मे २०१७ रोजी गंगामाईच आगमन झाल होत ती जून मध्ये गेली आणि आठ महीन्यांनी आज सकाळी पुन्हा गंगामाईचं आगमन झालय. तीन वर्षातून एकदा येणारी गंगा या वर्षात दोन वेळा अवतरलीय. राजापूरची हि गंगा अनेकांसाठी गुढ मानली जात आहे. ही गंगा अनेकांचं श्रद्धास्थान आहे.
उन्हाळे गावात हि गंगा अवतरते. सध्या उन्हाळे गावातल्या १४ कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. गो मुखातून हे पाणी येण्यास सुरुवात झालीय. इथल्या गंगा कुंडात १० नद्यांचं पाणी येतं असं सांगितलं जात. उन्हाळे गाव मुंबई गोवा महामार्गावरच आहे. त्यामुळे कोकणात येणा-या पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे त्यामुळे गंगेच्या ठिकाणी गर्दी होणार एवढं मात्र नक्की.