गणपती विसर्जनानंतर कोकणात घरावर रेती का फेकतात? कारण फारच रंजक; पाहा Video

Ganapati Visarjan Kokan Rituals: कोकणामधील या आगळ्यावेगळ्या प्रथेला एक फार खास महत्त्व असून अनेकांना त्याबद्दलची कल्पना नसते. या प्रथेचा नक्की अर्थ काय आणि अशाप्रकारे घरावर आणि शेतात रेती का फेकली जाते जाणून घेऊयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 19, 2024, 04:08 PM IST
गणपती विसर्जनानंतर कोकणात घरावर रेती का फेकतात? कारण फारच रंजक; पाहा Video title=
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Ganapati Visarjan Kokan Rituals: गणरायांचं विसर्जन झाल्यानंतर आता चाकरमानी पुन्हा मुंबईत परतले आहेत. 10 दिवस भक्तीभावाने गणरायांची सेवा केल्यानंतर त्याला निरोप देऊन पुन्हा पुढच्या वर्षी कधी कोकणात जायला मिळणार याचा विचार करत कोकणी चाकरमानी पुन्हा कार्यालयांमध्ये परतले असून मुंबई पुन्हा गजबजून गेल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र गणेश उत्सवाच्या आठवणींमध्ये अनेकजण अजूनही रमून आहेत. विसर्जन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे कोकणातील पारंपारिक गणेशोत्सवाची महिती देणारे काही व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यापैकीच एका व्हिडीओमध्ये कोणकणामध्ये गणपतीचं विसर्जन केल्यानंतर ज्या ठिकाणी विसर्जन केलं त्या पाणवठ्यामधील माती/ रेती बाप्पाला विसर्जनासाठी ज्या पाटावर नेलं त्यावरुनच घरी आणून छप्परावर तसेच शेतांमध्ये फेकली जाते. मात्र या परंपरेमागील तिर्क काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. त्याचबद्दल जाणून घेऊयात...

पाटाबरोबर प्रसादाची शिदोरी

कोकणामध्ये कृत्रिम तलावांमध्ये नाही तर नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. त्यानंतर ज्या ठिकाणी विसर्जन केलं तेथील विसर्जित केलेल्या बाप्पाच्या पायाखालची पाणवठ्यामधील माती (म्हणजेच रेती) पाटावरुन घरी आणली जाते. त्यानंतर प्रत्येक पाटाबरोबर प्रसादाची शिदोरी तयार केली जाते. यामध्ये प्रत्येक घरातून आणलेल्या नैवेद्याला काला करुन केलेला प्रसाद वाटला जातो.

माती घरावर का टाकतात?

पाणवठ्यामधील माती घरी आणल्यानंतर ती काही ठिकाणी 'लाग्या रे लाग्या...' तर काही ठिकाणी 'गाज गाज गज्या...' म्हणत घराच्या छप्परावर आणि शेतामध्ये टाकली जाते. यामधून तुझा आशिर्वाद आमच्या घरादाराला लागू दे, असं मागणं गणरायाकडे केलं जातं. याचसंदर्भातील एक रंजक व्हिडीओ चाकरमानी व्हॉग्स नावाच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> Ganpati 2025 Date: होय! पुढल्या वर्षी बाप्पा लवकरच येणार.. गणेश चतुर्थी 2025 ची तारीख पाहिली का?

या व्हिडीओमध्ये गणरायाच्या विसर्जनापासून ते अशाप्रकारे विसर्जनानंतर बाप्पाचा आशिर्वाद सोबत राहावा म्हणून घराच्या छप्परावर, शेतात रेती फेकण्यापर्यंतचा रंजक प्रवास दाखवण्यात आला आहे.

कमेंट्सचा पाऊस

हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून अनेकांनी ही रंजक माहिती सांगितल्याबद्दल या व्हॉगरचे आभार मानले आहेत. तर बऱ्याच जणांनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्याकडील माहिती दिल्याचं दिसत आहे. "विसर्जन करून आल्यावर मखरामध्ये बाप्पाला घेऊन गेलेला पाठ परत ठेवतो. आरती करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरात दिवाबत्ती करून नंतर ती माती अगरबत्तीने ओवाळून ती घरावर आणि शेतामध्ये जाऊन फेकतो. जेणेकरून गणपती बाप्पाची आम्हाला साथ लाभेल," असं रोशनी जाधव यांनी म्हटलं आहे. इतरही अनेकांनी या अशा परंपराच कोकणातील गणेशोत्सव अधिक विशेष बनवतात असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 4 लाखांच्या खऱ्या सोनसाखळीसहीत गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केलं; घरी आल्यावर...

वयस्कर महिला मागतात आशिर्वाद

अनेक ठिकाणी वयस्कर महिला बाप्पाच्या विसर्जनानंतर पाणवठ्यामधून आणलेली ही रेती भावकीमधील वेगवेगळ्या नातलगांच्या शेतात फेकून बाप्पाचा आशिर्वाद राहू दे आणि भरपूर पिक येऊ दे अशी प्रार्थना करतात.

तुम्हाला या प्रथेबद्दल ठाऊक होतं का? कमेंट करुन नक्की सांगा....