अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दाम्पत्यांच्या (Rana Couple) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राणा दाम्पत्याला शक्तीप्रदर्शन करणं चांगलंच महागात पडलंय. राणा दाम्प्त्याला नियमाचं उल्लंघन करणं भोवलंय. राणा दाम्पत्याविरोधात आता पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाला आहे. राणा दाम्पत्यानं शनिवारी काढलेल्या जल्लोष मिरवणुकीप्रकरणी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. (gadge nagar and rajapeth police file case against navneet and ravi rana for holding unauthorized rally)
हनुमाना चालिसा पठणाच्या वादानंतर तब्बल 36 दिवसांनी राणा दाम्पत्य अमरावतीत दाखल झाले. यानंतर राणा दाम्पत्याचं युवा स्वाभिमानी पक्षाकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राणा दाम्पत्यांनी त्यानंतर हनुमान पठणही केलं.
कार्यकर्त्यांचा उत्साह इतका होता की रात्रभर राणा दाम्प्त्यांचं मिरवणूक सुरुच होती. नियमांनुसार रात्री 10 नंतर कोणत्याही जाहीर कार्यक्रमाला परवानगी नसते. मात्र यानंतरही विनापरवनगी जल्लोषात मिरवणूक काढल्याने गुन्हा दाखल झाला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे 2 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांसह युवा स्वाभिमानच्या शंभर पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर गाडगेनगर आणि राजापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.