आयपीएल सट्टा प्रकरणात पोलीस खात्यातील माजी अधिकाऱ्याचेही नाव

मुंबई पोलिसात हा अधिकारी कार्यरत होता. पोलिसांना अडचणीत आणण्यासाठी हा अधिकारी सोनू जलालला मदत करत असल्याच आरोप होतोय

Updated: Jun 4, 2018, 02:07 PM IST
आयपीएल सट्टा प्रकरणात पोलीस खात्यातील माजी अधिकाऱ्याचेही नाव title=

ठाणे : आयपीएल सट्टाप्रकरणी बॉलिवुडमधल्या अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं पुढं आल्यानंतर आता पोलीस खात्यातल्याही माजी अधिकाऱ्यांची नावं उघड होऊ लागली आहेत. पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या माजी पोलीस अधिकाऱ्याचं सट्ट्यात नाव पुढं आलंय. या अधिकाऱ्यानं १९९५मध्ये राजीनामा दिला होता. मुंबई पोलिसात हा अधिकारी कार्यरत होता. पोलिसांना अडचणीत आणण्यासाठी हा अधिकारी सोनू जलालला मदत करत असल्याच आरोप होतोय. 

पराग संघवीलाही समन्स

ठाणे खंडणीविरोधी पथक या माजी पोलीस अधिकाऱ्याला समन्स पाठवण्याच्या तयारी आहेत.  तर दुसरीकडे  चित्रपट निर्माता पराग संघवीलाही  ठाणे खंडणी पथकाकडून समन्स बजावलं जाणार आहे.. आता पराग संघवीच्या चौकशीतून सट्टा लावणाऱ्या आणखी सेलिब्रिटींची नावं बाहेर येणार का, याची उत्सुकता आहे... दरम्यान सोनू जालानवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय.  ठाणे नगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका मसाले व्यवसायिकाकडे रवी पुजारीकडून धमकी देवून ३ कोटींचा फ्लॅट आपल्या नावी केल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.

सट्टा प्रकरणातील ठळक मुद्दे

  • बेटिंग प्रकरणात माजी पोलिसाचे  नाव
  • संशयीत अधिकारी पीएसआय दर्जाचा 
  • ९५ च्या आसपास दिला होता राजीनामा
  • पोलिसांना अडचणीत आणण्यासाठी सोनू जलालला मदत करत असल्याचा अधिकाऱ्यावर आरोप