माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं पुण्यात निधन

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं सोमवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.  

Updated: Aug 18, 2020, 01:01 PM IST
 माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं पुण्यात निधन   title=

पुणे, पंढरपूर : माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं सोमवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सुधाकरपंत परिचारक यांनी सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि २०१९ ला भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांनी गेली २५ वर्षे त्यांनी पंढरपूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. सुधाकरपंत परिचारक यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु होते. वसंतदादा पाटील गटाचे नेते त्यानंतर शरद पवार यांच्या सोबत त्यांनी काम केले. त्यांच्या पश्चात पुतणे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.    

सुधाकरपंत परिचारक यांचे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मोठे नाव होते.  त्यांनी पंढरपूर मतदार संघाचे विधानसभेत दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. सहकारी साखर कारखाना, बँक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामाने त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले. सुधाकरपंत परिचारक यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यात  उपचार सुरु होते. त्यांनी रात्री अखेरचा श्वास घेतला. सुधाकरपंत परिचारक यांनी सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांनी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. सुधाकरपंत परिचारक यांनी २०१९ मध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

सुधाकरपंत परिचारक हे दहा वर्ष राष्ट्रवादीचे आमदार होते. २००९मध्ये सुधाकरपंत परिचारक यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीरही झाली होती. गेल्या दहा वर्षांच्या काळात सुधाकरपंत निवडणुकांपासून लांब राहिले. २०१४ च्या निवडणुकीपासून परिचारकांनी राष्ट्रवादीसोबतही काडीमोड घेतला. मात्र गेल्या वर्षी सुधाकरपंतांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली.

सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. भाजपने तिकीट न दिल्यास अपक्ष लढा, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, मात्र भाजपने त्यांना तिकीट दिल्याने सुधाकरपंत रिंगणात उतरले. मात्र ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंतांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु मोहिते पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला.