औरंगाबाद : दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी (police custody) ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, जाधव यांनी आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे म्हटले आहे.
आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि झालेली अटक ही राजकीय हेतूने झाल्याचा हर्षवर्धन जाधव यांचा न्यायालयात दावा. आपण आपली सहकारी इशा झा हिच्यासोबत पुण्यातील बावधन भागातील एका दुकानात गेलो असता फार्यादीने दोघांचे अपहरण करुन मारहाण केल्याचे हर्षवर्धन जाधव यांचं म्हणणे.
पोलीस आपली तक्रारच घेत नसल्याची तक्रार हर्षवर्धन जाधव यांच्याकडून न्यायालयासमोर करण्यात आली. मारहाणीची ही घटना सोमवारी घडलेली असताना गुन्हा मंगळवारी संध्याकाळी दाखल झाला आणि त्यामागे राजकीय हात असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. मारहाण प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे.
दरम्यान, सासरे रावसाहेब दानवे यांनी आपल्याला या प्रकरणात अडकवल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडकी कॅन्टॉनमेंट बोर्डातील काँग्रेसचे नगरसेवक मनीष आनंद यांची मदत घेतल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांच्या वकिलांनी केला आहे. काँग्रेसचे नगरसेवक मनीष आनंद यांनी त्यांच्या सहकार्यांसह आपल्याला मारहाण केल्याचा हर्षवर्धन जाधव यांचा आरोप आहे.