Gajanan Bababr Death | शिवेसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचं निधन

शिवसेनेचे माजी खासदार आणि भाजपचे नेते गजानन बाबर (Gajanan Babar) यांचं निधन झालं आहे.

Updated: Feb 2, 2022, 06:19 PM IST
Gajanan Bababr Death | शिवेसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचं निधन title=
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे : शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि भाजप नेते गजानन बाबर (Gajanan Babar) यांचं निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. बाबर यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 2  महिन्यांपासून ते पोटाच्या विकारामुळे  आजारी होते. सोबतच त्यांना कोरोनाची लागणही झाली होती. मात्र उपचारादरम्यान आज दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबर यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. (former maval loksabha constituency mp and bjp leader gajanan babar passed away at age of 78)

कोण होते गजानन बाबर?

बाळासाहेबांचा कडवट,कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक अशी गजानन बाबर यांची ओळख होती.  गजानन बाबर यांचा नगरसेवक ते खासदार असा मोठा राजकीय प्रवास राहिला आहे. 

गजानन बाबर हे 3 नगरसेवक राहिले होते. तसेच हवेली विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी 2 वेळा प्रतिनिधित्व केलं. तसंच मावळ लोकसभा मतदारसंघातून ते 2 वेळा संसदेत निवडून गेले होते.

लोकसभा 2014 च्या निवडणुकीच्या वेळेस गजानन बाबर यांना उमेदवारी नाकारण्यात आली. बाबर यांना डावळून श्रीरंग बारणे यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे ते पक्षावर नाराज होते. यामुळे त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेत प्रवेश केला. 

मात्र मनसेतही ते फार काळ राहिले नाहीत. मनसेची साथ सोडल्यानंतर बाबर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.