शिवप्रेमी विद्यार्थ्यांच्या ट्रकला अपघात, ५ ठार २५ जखमी

नागाव फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात पाच तरूणांचा मृत्यू तर, २५ तरूण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातातील तरूण शिवजयंतीचे औचित्य साधून शिवज्योत घेऊन पन्हाळ्याहून सांगलीला निघाले होते. 

Updated: Feb 19, 2018, 09:22 AM IST
शिवप्रेमी विद्यार्थ्यांच्या ट्रकला अपघात, ५ ठार २५  जखमी title=

कोल्हापूर : नागाव फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात पाच तरूणांचा मृत्यू तर, २५ तरूण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातातील तरूण शिवजयंतीचे औचित्य साधून शिवज्योत घेऊन पन्हाळ्याहून सांगलीला निघाले होते. 

हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नागाव गावाजवळच्या फाट्यावर घडला. प्राप्त माहितीनुसार, पहाटेच्या साडे चार वाजता सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी सांगलीतल्या वालचंद महाविद्यालयातील असून त्यांची ओळख पटविण्यात येत आहे.

शिवजयंतीनिमित्त हे सर्व विद्यार्थी पन्हाळ्यावरून शिवज्योत घेऊन सांगलीला निघाले होते. ही ज्योत नेण्यासाठी त्यांनी ट्रकचा वापर केला होता. ट्रकमध्ये सुमारे ३० विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्योत घेतलेला विद्यार्थ्यांचा ट्रक सांगलीला निगाला असता रस्त्यात एका दुचाकीस्वाराने दिलेल्या हुलकावणीमुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.