सिंधुदुर्ग : काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पारंपरिक मच्छिमारांसाठी केलेले आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याची टीका अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलीय.
याआधी नितेश राणे पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने कधथी उभे राहिले नाहीत. मात्र आपल्यापासून पारंपरिक मच्छिमार दुरावत चालल्याचे लक्षात आल्यामुळे अधिकाऱ्यांवर मासा फेकून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट राणेंनी केल्याचा आरोप दामोदर तांडेल यांनी केलाय.
मच्छिमारांच्या खांद्याला खांदा लावून लढा असं आवाहन तांडेल यांनी दिलंय. शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांनाही कर्जमाफी मिळावी, अशी मागणीही तांडेल यांनी केलीय.