किरण ताजणे, नाशिक : वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि पोलिसांचे संख्याबळ पाहता नाशिक पोलिसांनी अत्याधुनिक यंत्रणा उभी केलीय. राज्यातील पहिलीच स्मार्ट पोलीस चौकी नाशिकमध्ये सुरू करण्यात आली आहे नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांकडून वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जातात. त्यात आता आणखी एक भर पडलीय ती म्हणजे स्मार्ट पोलीस चौकीची.
नाशिकच्या भद्रकाली परिसरात ही स्मार्ट पोलीस चौकी उभारण्यात आलीय. चहुबाजूंनी सीसीटीव्ही यंत्रणा, ज्यातून सर्व हालचाली टिपल्या जाणार आहे. चौकीच्या बाहेर डिजिटल बोर्ड असणार आहे. त्यावर सूचना आणि सर्व हेल्पलाईन नंबर असणार आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पोलिसांशी संपर्क होणार आहे.
एकूणच मदतीच्या वेळी पोलिसांशी एका क्षणात संपर्क होणार आहे. पोलिसांच्या नव्या या प्रयोगाला यश मळावं आणि शहरातील गुन्हेगारी बंद व्हावी हीच सर्वसामान्य नाशिककरांची अपेक्षा.