प्रताप नाईक, झी मीडिया
सांगलीः लग्नाचे (Wedding) क्षण हे सगळ्यांसाठी अनमोल असतात. मात्र, एका सांगलीत (Sangali) लग्नाच्या दिवशीच अशी एक घटना घडली की प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले आहे. तर, घडलेल्या प्रकाराने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. (Sangali Wedding Crime News)
सांगलीत लग्नाची वरात निघाली होती. सगळे नाचण्यात धुंद होते. त्याचवेळी एका एकाने हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. लग्नाचा जल्लोष साजरा करताना अघटित घडले आहे. लग्नाच्या वरातीत नाचताना हवेत गोळीबाक करताना एका तरुणाला गोळी लागली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. सांगलीत्या शिराळा तालुक्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन एका निवृत्त जवानासह एकाला शिराळा पोलिसांनी अटक केली आहे.
शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव येथील तरुण अवधूत देसाई याचे बुधवारी लग्न होते. लग्नानंतर रात्री वधू-वरांची मोठ्या थाटा-माटात वरात निघाली होती. यावेळी लग्नाच्या वरातीत नाचत असताना एकाने रिव्हॉल्व्हरने हवेत गोळीबार केला. मात्र, दुसऱ्या वेळी जेव्हा आरोपींनी हवेत गोळी चालवली तेव्हा मात्र अनर्थ घडला. तरुणाने गोळीबार करताच दुसऱ्या वेळी गोळी सुटून वरात पाहण्यासाठी समोर थांबलेल्या तरुणाच्या दंडातून आरपार गेली.
घटना घडताच आनंदात असलेल्या कुटुंबीयांचे चेहरे चिंताग्रस्त झाले. लग्नाच्याच दिवशी हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ उडाला. या गोळीबारात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. हृतिक दिलीप इंगळे, वय 23 असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी केंद्रीय राखीव पोलिस दलातील सेवानिवृत्त जवान संजय सखाराम देसाई आणि गोळीबार करणाऱ्या ओमकार भगवान देसाई या दोघांना शिराळा पोलिसांनी अटक केली आहे.
खंडणी स्वीकारण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराने पोलिसांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, पोलिसांनीही तेवढ्याच ताकदीने या हल्लेखोरांना प्रतिउत्तर दिलं आहे. मात्र या घटनेने नांदेड (Nanded) शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे खंडणीखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाहीये