ठाण्यात सिमेंटचा मिक्सर रस्त्यावरच जळून खाक

आग आटोक्यात आणण्यात यश आलंय

Updated: Jul 21, 2018, 02:17 PM IST

ठाणे : ठाण्यात सिमेंटच्या मिक्सरला आग लागल्याची घटना घडली. खारेगाव टोलनाक्याजवळ ही दुर्घटना घडलीय. सिमेंटच्या मिक्सरला लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या... अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना ही आग आटोक्यात आणण्यात यश आलंय. 

या आगीत सिमेंट मिक्सर जळून खाक झालाय. या आगीचं अद्याप नेमकं कारण समजू शकलेलं नाही.