अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नागोठणेनजीक लाकडी फोरक्लिपच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे येथील माल उचलण्यासाठी लागणारे लाकडी फोरक्लिप बनवणाऱ्या गोदामाला बुधवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत लाकडी साहित्य जळून खाक झाले.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे तीन बंब आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते . मात्र आग अटोक्यात आली नव्हती. आग लागलेले ठिकाण मानवी वस्तीपासून दूर असल्याने भीषण दुर्घटना टळली आहे. दरम्यान या गोदामात तयार केले जाणारे फोरक्लिप जवळच्या कंपन्यांना पुरवले जात होते . परंतु या गोदामाला परवानगी होती का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.