भोर, पुणे : Fire at the film shooting godown : भोरमध्ये रामबाग परिसरात फिल्म शूटिंगच्या गोडाऊनला मोठी आग लागली. या लागलेल्या आगीत संपूर्ण गोडावून जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत सुमारे 11 लाखांचं नुकसान झाले आहे. आगीचं कारणं अद्याप अस्पष्ट आहे.
अग्निशामक दलाचे जवान आणि सह्याद्री रेस्क्यू टीम यांच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. गोडावूनमध्ये कपडे, दागिने, टेबल, खुर्चीसह शूटिंगच्या सेटसाठी वापरलं जाणारं साहित्य ठेवण्यात आलं होते. आगीत हे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे.
भोरला तालुक्याला निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा लाभला असल्यानं अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतल्या निर्मात्यांची, चित्रिकरणासाठी भोरला पसंती दिली जात आहे. त्यामुळं भोर तालुक्यात हिंदी मराठी चित्रपट, जाहिराती, गाणी यांचं चित्रिकरण मोठ्या प्रमाणात होत असते.
या शूटिंगसाठी लागणारं मटेरियल ठेवलेल्या, भोरमधील रामबाग परिसरात असणाऱ्या गोडाऊनमध्ये, कपडे, दागिने, खूर्ची, टेबलंसह शूटिंगच्या सेटसाठी लागणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. संध्याकाळच्या सुमारास अचानक गोडाऊनमधून धूर येण्यास सुरुवात झाली, आणि थोडयाच वेळात आगीने भीषण रुप धारणं केले.
काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान आणि सह्याद्री रेस्क्यू टीमचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली.