डी.एस.कुलकर्णींविरोधात आणखी एक गुन्हा

पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

Updated: Nov 19, 2017, 10:22 PM IST
डी.एस.कुलकर्णींविरोधात आणखी एक गुन्हा  title=

पुणे : पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कर्मचा-यांच्या प्रॉव्हिडंट फंडचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डीएसके आणि त्यांच्या कंपन्यांच्या चार संचालकांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. डीएसके डेव्हलपर्सच्या संचालकांनी कर्मचा-यांच्या पगारातून कपात केलेली ८ लाख ६७ हजार रुपयांची पीएफची रक्कम भरलेली नाही. तर ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी याआधी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.