नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सवसाठी जबरदस्तीने वर्गणी वसूल करणाऱ्या नाशिकमधल्या ४ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामगार क्रांती माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह चार जणांवर या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातले तीन जण अटकेत असून एक जण फरार झाला आहे. या टोळक्याने कंपनीच्या मालकाकडे 11 हजार रुपयांची वर्गणी मागितली होती.
नाशिक शहरात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे, काही दिवसांपूर्वी एका सराईत गुन्हेगाराचा एका टोळक्याने खून केल्याची घटना समोर आली होती.
यापूर्वी नाशिकमध्ये बाईक जाळण्याचं लोण पसरलं होतं, आता बाईक चोरीचं लोणं पसरलं आहे.