Latest Political Update: विदर्भात मोठा कोळसा घोटाळा; ED, CBI कारवाईसाठी थेट गृहमंत्री अमित शहा यांना पत्र?

Chadrapur amit shah news: दगड आणि मातीयुक्त कोळसा पुरवठ्यामुळे विदर्भातील वीज प्रकल्प आणि लघुउद्योग (coal energy) संकटात आलं आहे. कोळशात भेसळ करणाऱ्या गब्बर व्यापाऱ्यांविरोधात ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची (ED CBI and Income Tax) कारवाई करा असं म्हणणार खुलं पत्र फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भ संघटनेनं गृहमंत्री अमित शाह (home minister amit shah) यांना लिहिलं आहे.

Updated: Dec 10, 2022, 06:09 PM IST
Latest Political Update: विदर्भात मोठा कोळसा घोटाळा; ED, CBI कारवाईसाठी थेट गृहमंत्री अमित शहा यांना पत्र? title=
chandrapur news

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: दगड आणि मातीयुक्त कोळसा पुरवठ्यामुळे विदर्भातील वीज प्रकल्प आणि लघुउद्योग (coal energy) संकटात आलं आहे. कोळशात भेसळ करणाऱ्या गब्बर व्यापाऱ्यांविरोधात ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची (ED CBI and Income Tax) कारवाई करा असं म्हणणार खुलं पत्र फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भ संघटनेनं गृहमंत्री अमित शाह (home minister amit shah) यांना लिहिलं आहे. कोळशातील खुल्या जाहीर लिलावामुळे कोळसा व्यापाऱ्यांनी कोळसा शिल्लक नसल्याचे भासवून अमाप लूट चालविल्याचा आरोप त्यांनी या व्यापारांवर केला आहे. येत्या काळात ही लूट न थांबवल्यास वीजनिर्मितीसह (electricity) इतर सर्व लघुउद्योग टप्प्याटप्प्याने बंद होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. चंद्रपूरसह विदर्भात कोळसा पुरवठा दर्जेदार व्हावा यासाठी केंद्र सरकारने (central goverment) लक्ष घालण्याची केली आग्रही मागणी केली आहे. (Federation of Industries Association Vidarbha organizations open letter to Home Minister Amit Shah demanding ED CBI Income Tax action against traders who adulterate coal)

विदर्भात अत्यंत मौल्यवान असलेला कोळसा हा खनिज इथल्या हजारो लघु उद्योगांचा स्वस्त इंधन स्त्रोत आहे. मात्र कोळसा शिल्लक नसल्याचे भासवून कृत्रिम टंचाई निर्माण करत काही गब्बर व्यापारी कोळसा पुरवठा करताना माती अन् स्पॉन्ज आयरनचा टाकाऊ माल व गोटे यासारखे घटक भेसळ करून त्यावर पाणी मारत हेराफेरी करून अब्जावधी कमवत असल्याचा आरोप केला जातो आहे. लघु उद्योग व वीज केंद्राची दिशाभूल करत हे बिनबोभाट केले जात असल्याचा आरोप अन्य कुणी नव्हे तर फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भ संघटनेने (vidharbha) केला आहे. दगड, मातीयुक्त कोळसा पुरवठ्यामुळे विदर्भातील लघुउद्योग संकटात आले असून एका उद्योगाच्या मागे असलेले 200 ते 400 मनुष्यबळ बेरोजगार (unemployment) होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. 

कोळशात भेसळ करणाऱ्या विदर्भातील गब्बर व्यापाऱ्यांविरोधात ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची कारवाई करावी यासाठी उद्योग संघटनेने थेट गृहमंत्री अमित शाह यांना खुले पत्र पाठविले आहे. कोळशातील खुल्या जाहीर ई-लिलावामुळे कोळसा व्यापाऱ्यांनी कोळसा शिल्लक नसल्याचे भासवून भेसळीतून अमाप लूट चालविल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अगदी वर्षभराआधी 5000 रूपये टन असलेला कोळसा गब्बर कोळसा व्यापा-यांच्या हेराफेरीमुळे चक्क 15 हजार रूपये प्रति टनावर पोचला आहे. येत्या काळात ही लूट न थांबवल्यास वीजनिर्मितीसह इतर सर्व लघुउद्योग टप्प्याटप्प्याने बंद होणार असल्याचा इशाराच संघटनेने दिला आहे. चंद्रपूरसह विदर्भात कोळसा पुरवठा दर्जेदार व्हावा यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालण्याची आग्रही मागणी उद्योग संघटनेने (association) केली आहे. 

संघटनेचं काय म्हणणं आहे? 

येथे कोळश्याचं प्रमाण कमी आहे म्हणून व्यापारांनी फसविले आहे त्यातून त्यात माती आणि पाणी घालून भेसळ करण्यात आली. त्याचसोबत अशा कोळश्यात काम केल्यानं अनेकांच्या तब्येती बिघडल्या. आधी 5-10 हजारांच्या कोळश्याची किंमत 14 हजारांपर्यंत गेली. तेव्हा अशा कृतींमुळे आमचे नावं खराब होत अशा वेळी गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यांची ईडी सीबीआय कारवाई करावी.