सोलापूर : करमाळा वीट शेतकरी धनाजी जाधव यांनी आत्महत्या केली. राज्याचे मुख्यमंत्री या गावात आल्याशिवाय अंत्यविधी करु नका, असे सांगून जाधव यांनी आत्महत्या केली. तशी त्यांनी चिठ्ठी लिहीली. त्यानंतर नातेवाईकांनी मुख्यमंत्री आल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याचा निर्धार केलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात येईपर्यंत माझ्या मृतदेहाला अग्नी देऊ नका, अशी चिठ्ठी लिहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट गावातील शेतकरी धनाजी जाधव यांनी आत्महत्या केली. जाधव यांनी बुधवारी रात्री 8 च्या सुमारास आत्महत्या केलीय. धनाजी जाधव यांना अडीच एकर कोरडवाहू जमीन असून त्यांच्यावर स्टेट बँक, सोसायटीचे लाखो रुपये कर्ज होते.
घरातील थोरला व्यक्ती असल्याने सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. आई,वडील, लहान भाऊ, पत्नी, आणि २ मुले असे त्यांचे कुटुंब आहे. मात्र शेतीतील सततच्या नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी मित्रांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून त्यात मुख्यमंत्री आल्याशिवाय आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे कर्ज माफ झाल्याशिवाय मला जाळू नका,अशी विनंती केलेय.