नाशिक : केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रात ठेवण्यासाठी कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. व्यापाऱ्यांच्या या आडमुठे धोरणामुळे शेतकरी सणासुदीच्या दिवसात अडचणी आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत आज ९० टक्के कांदा खरेदी बंद राहणार आहे. शासनाने केवळ २५ टन कांदा साठवणूक करण्याचे निर्बंध लागू केल्याने व्यापार होणार ठप्प आहे. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे व्यापारी कांदा खरेदीत सहभाग घेणार नाहीत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश मिळत नाही तोपर्यंत मोठ्या व्यापाऱ्यांची शेतकऱ्याकडून कांदा खरेदी न करण्याची भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी प्रशासकीय आदेशांनंतर खरेदी सुरू होणार आहे. देशांतर्गत तुटवडा अधिक वाढणार परिणामी भाव वाढण्याची शक्यता आहे.
कांद्याला सोन्याचा बाजार आला आणि चोरट्यांनी आपला मोर्चा आता साठवणुकीत असलेल्या कांदा चाळीवर वळला असुन जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील वरद देसाई यांनी साठवणुक केलेल्या ५८ पिशव्या कांद्यावर चार दरोडेखोरांनी डल्ला मारला मात्र ओतुर पोलीसांनी बारा तासांत दरोडे खोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.कांद्याला चांगला बाजारभाव आल्याने आता शेतक-यांना चांगले दिवस येत आहेत मात्र आता या कांद्यावर चोरट्यांची नजर पडली आहे.त्यामुळे शेतकरी डोळ्यात तेल घालुन कांद्याचे राखण करत आहे.