Kisan Long March: वाट चालावी चालावी...आता गड्या थांबायचा नाय... शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने धडक

Kisan Sabha Morcha : नाशिकहून (Nashik) शेतकरी पुन्हा मोर्चा मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. जर बोलणी केली नाही तर मुंबई बंद करु, असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे.  शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले आहेत. ( Kisan Morcha)  

Updated: Mar 15, 2023, 10:47 AM IST
Kisan Long March: वाट चालावी चालावी...आता गड्या थांबायचा नाय... शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने धडक title=
शेतकरी मोर्चा । Kisan Sabha Morcha । छाया - सागर आव्हाड, नाशिक

Kisan Sabha Long Morcha : शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले आहेत. ( Kisan Morcha) शेतकऱ्यांबरोबरची बोलणी पुढे ढकल्याने शेतकऱ्यांनी आपला निर्धार सुरुच ठेवला आहे.  (Kisan Sabha Morcha) नाशिकहून (Nashik) पुन्हा मोर्चा मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. जर बोलणी केली नाही तर मुंबई बंद करु, असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे. (Farmers are aggressive, Kisan Sabha warns Chief Minister Eknath Shinde, 'Mumbai will be shut down')

लाल वादळ मुंबईत धडकणार

Kisan Sabha Morcha :  मोर्चेकर्‍यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी स्वयंपाक बनवला. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.आपल्या न्याय हक्कासाठी राज्यातील हजारो कष्टकरी, शेतकऱ्यांनी  रविवारी नाशिक (Nashik) इथून पायी चालण्यास सुरुवात केली  (Kisan Sabha Morcha) येत्या 23 मार्च रोजी मुंबईत विधान भवनावर धडकणार आहेत. राज्य सरकारच्या श्रमिक विरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. लाल वादळ मुंबईत धडकणार आहेत. ( Kisan Morcha)  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांचा इशारा

मुख्यमंत्र्यांनी इकडे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी अन्यथा मुंबई बंद करु, असे आमदार विनोद निकोले म्हणाले आहेत.  शेतकऱ्याचा मोर्चा हा घाटणदेवी या ठिकाणी थांबलेला आहे. आता मोर्चाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोर्च्याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना भेटायला यावे, मोर्चा मुंबईत जाण्यापेक्षा त्यांनी इकडे यावे, अशी मागणी आमदार निकोले यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मुंबईही कुठल्याही क्षणी बंद करु. सभागृहामध्ये विरोधकांना बोलू दिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार कसा, असा सवाल आमदार विनोद निकोले यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, किसान सभेच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. राज्य सरकारकडून बैठकीचा निरोप आला नाही, तर राज्यभरात रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय. बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडणार आहे.