शेतकरी आंदोलन : केंद्राने राज्यांशी चर्चा करुन कायदा करायला हवा होता - राज ठाकरे

शेतकरी आंदोलनावर (Farmer Protest ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केले आहे.  

Updated: Feb 6, 2021, 04:57 PM IST
शेतकरी आंदोलन : केंद्राने राज्यांशी चर्चा करुन कायदा करायला हवा होता - राज ठाकरे  title=

ठाणे : शेतकरी आंदोलनावर (Farmer Protest ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केले आहे. शेतकरी आंदोलन जास्त चिघळत चालले आहे. त्यांच्या मागण्या काय आहेत, हे केंद्र सरकारने (Central Government) पाहिले पाहिजे. केंद्राने जो कायदा केला आहे. तो चुकीचा नाही. मात्र, ज्या काही त्रुटी राहील्या आहेत. त्या दूर केल्या पाहिजेत. एक दोन लोकांसाठी या कायद्याचा उपयोग होता कामा नये. आज जे आंदोलन करत आहेत ते शेतकरी आहेत. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे. कृषी कायदा (Agriculture Act) करताना केंद्राने राज्यांशी चर्चा करुन कायदा करायला हवा होता, असे राज ठाकरे म्हणाले.

'शेतकरी आंदोलन फारच चिघळले आहे'

शेतकरी आंदोलनावर राज ठाकरे म्हणाले, मला असे वाटते हे फारच चिघळले आहे. आम्ही हे सगळे पाहत आहोत. शेतकरी हा सामान्य आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागे कोण आहेत. त्यांना पैसे कुठून येतायेत वगैरे, याचा शोध घ्यावा. पण शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे. सरकारने जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यामध्ये कृषी खाते आहे. प्रत्येक राज्याची कृषी धोरणे वेगळी आहे. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री वा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होता. आता हे आंदोलन  इतके चिघळायची गरज नव्हती.

आज जे काही चाललं आहे, ते चुकीचे आहे. भारत रत्न असलेल्यांना पुढे करुन केंद्र सरकार त्यांना बोलायला लावत आहेत. कोण कुठली ती गायिका, तुम्हाला तरी माहीत होती का? केंद्र सरकार तिला उत्तर देते? अनेक सिलेब्रिटी यांना ट्विट करायला लावू नये. ही सगळी साधी माणसे आहेत . त्यांचा वापर अशा साठी होऊ नये, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी ट्विट करत परदेशी गायिकेला उत्तर दिले होते. त्यावर राज यांनी नाव न घेता भाष्य केले.

वीजबिलावार राज ठाकरेंचे भाष्य

दरम्यान,वीज बिलाबाबत आम्ही आधी आंदोलन केले भाजप कुठे होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मी वीबिलाबाबत बोललो. मी याबाबत पत्र लिहिलं नंतर कळलं अदानी पवार यांच्या घरी येऊन गेले आणि मग कळलं वीजबिल कमी होणार नाही. लॉकडाऊनमध्ये दुकान बंद होते, आता त्यानंतर ओरबडण्याचं काम सुरू आहे, असे  दिसत आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.

लोकांना वेड समजू नका ?

औरंगाबाद नामांतर भाजपची सत्ता केंद्रात राज्यात होती तेंव्हा  का नाही नामांतर झाल. याच उत्तर भाजप शिवसेना दोघांनी द्यावे. लोकांना वेड समजू नका. निवडणूक तोंडावर हा प्रश्न कसा आला ? संभाजीनगरची जनता सुज्ञ आहे.