प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात अनेक कायदे बनवूनही बहिष्काराची प्रथा काही केल्या संपल्याचं नाव घेत नाही. याचाच प्रत्यय नंदुरबार जिल्ह्यात आला आहे.

Updated: Nov 23, 2017, 11:35 AM IST
प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार  title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात अनेक कायदे बनवूनही बहिष्काराची प्रथा काही केल्या संपल्याचं नाव घेत नाही. याचाच प्रत्यय नंदुरबार जिल्ह्यात आला आहे.

सामाजिक बहिष्कार

करजकुपे गावातील धनंजय पाटील आणि गायत्री यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यांनी समाज आणि गावाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. त्यानंतर गावातील लोकांनी दोघाचं गोत्र एकच असल्याचे सांगत, त्यांना विरोध करण्यास सुरवात केली. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीची मदत

काही दिवसांत परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा धरून त्यांनी याची तक्रार केली नाही. अखेर त्रास वाढल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुढाकाराने उपनगर पोलिसांत त्यांनी गुन्हा दाखल केला.

अखेर गुन्हा दाखल

तक्रारीनंतर याप्रकरणी महाराष्ट्र सामजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा आणि इतर कायद्या अंतर्गत बहिष्कार टाकण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी दिलीय.

धनंजय आणि गायत्री दांपत्याला प्रखर विरोधाचा सामना करावा लागतो आहे. पण या सगळ्याच्या निमित्ताने दोषींना कडक शासन होऊन महाराष्ट्राचे पुरोगामित्व ठामपण जपलं जावं, हीच मागणी होतेय.