पैसा झालाय खोटा | तुमच्या खिशातली १०० रुपयांची नोट खरी आहे का ?

आता बातमी तुमच्या खिशातल्या पैशासंदर्भातली. राज्यभरात बोगस नोटांचा सुळसुळाट झालाय. मराठवाड्यात या 

Updated: Dec 10, 2020, 09:01 PM IST
पैसा झालाय खोटा | तुमच्या खिशातली १०० रुपयांची नोट खरी आहे का ?  title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : आता बातमी तुमच्या खिशातल्या पैशासंदर्भातली. राज्यभरात बोगस नोटांचा सुळसुळाट झालाय. मराठवाड्यात या बोगस नोटा छापण्यात आल्या. त्या कुठे कुठे पसरल्यायत. १००, २००, ५००० आणि २ हजारांच्या या नोटा कितीही खऱ्याखुऱ्या वाटत असल्या तरी त्या चक्क बोगस आहेत. औरंगाबाद पोलिसांनी या नोटा जप्त केल्यायत. टीव्ही सेंटर भागात दोघे जण या बोगस नोटा घेऊन येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि पोलिसांच्या तावडीत दोघे सापडले.

 या नोटा बीडमध्ये छापण्यात आल्यायत. फक्त एक कॉम्प्युटर आणि एक प्रिंटरच्या मदतीनं या नोटा छापल्या गेल्या. गेले सहा महिने हा काळा धंदा सुरू होता. २० हजारांच्या बदल्यात १ लाखाच्या नकली नोटा मिळायच्या. 

कुणाकुणाला या नोटा देऊन गंडवण्यात आलंय. ते आता पोलीस शोधतायत. अनेक शहरांत या नोटा पसरवण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे या नोटा फिरत फिरत तुमच्या खिशातही आल्या असण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. कुणाकडूनही नोट परत घेताना शंभर वेळा तपासून घ्या.