प्रवीण दांडेकर / भंडारा : health department exam : आता एक धक्कादायक बातमी. आरोग्य विभागाच्या परीक्षार्थ्याना गुण वाढवून देण्यासाठी चक्क कॉल येत आहेत. मार्क वाढवायचे असेल तर परीक्षार्थ्यांकडून 80 हजारांची मागणी करण्यात येत आहे. मात्र, हे फेक कॉल असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, याप्रकरणी भंडारा पोलिसात तक्रार केली गेली आहे. फेक कॉलचे रॅकेट असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशा कॉलला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य आरोग्य विभागाचा D (चतुर्थ कर्मचारी) ग्रुपचा पेपर नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आला होता. या परीक्षेत भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील विवेक आगळे यांनी आरोग्य विभागाचा पेपर दिला. मात्र त्यांना एक कॉल आला की तुम्ही मॅरीड लिस्टमध्ये येण्यासाठी 10 गुण कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला 10 गुण वाढवायचे असेल तर तुम्ही 80 हजार रुपये द्यावे लागतील. तसेच नियुक्ती पत्र पाहिजे असल्यास 2 लाख रुपये द्यावे लागतील असे समोरच्या व्यक्तीने सांगितले.
इतकेच नाही तर या फेक कॉलवर सेंटर, पेपर सेट नंबर, OMR नंबर सुद्धा सांगितले आहे. माझा नावं सत्यप्रकाश असून चव्हाण सरांचा असिस्टंट आहे, असे सांगितले. त्यानंतर या महाभागाने ज्या खात्यावर पैसे पाठवायचे आहे. त्याची बँक डिटेल सुद्धा पाठवले. त्यामुळे आरोग्य भरतीची माहिती लीक झाली की काय असा प्रश्न आता पडू लागला आहे.
या फेक कॉलमुळे परीक्षार्थी संभ्रमात आहेत. त्यानी भंडारा शहर पोलिस स्टेशन गाठत तक्रार सुद्धा दिली आहे. आता हा फेक कॉल आहे. तर संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती या सत्यप्रकाश नावाच्या व्यक्तीकडे पोहोचली कशी, खरोखर आरोग्य विभागाच्या परीक्षेची माहीत लीक झाली की काय? आता या प्रकरणात चौकशी झाल्यावर सत्य पुढे येणार आहे, अशी परीक्षार्थी विवेक आगळे यांनी दिली.
आरोग्य विभागाची परिक्षार्थ्याना गुण वाढवून देण्यासाठी फेक कॉल येत आहेत, अशी तक्रार दाखल झाली आहे, अशी माहिती भंडाराचे पोलीस निरीक्षक शुभाष बारसे यांनी दिली. या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे की, मार्क वाढवायचे असेल तर परीक्षार्थीकडे 80 हजारांची मागणी केली गेली आहे. तर नियुक्ती पत्रासाठी 2 लाख रुपयांची मागणी आहे. कॉल करणारा मोठ्या अधिकाऱ्यांचा असिस्टंट असल्याची माहिती या कॉलवर दिली, असेही म्हटले आहे.