जादा बिल आकारल्याने या जिल्ह्यातील 6 कोविड रुग्णांलयाना नोटीस

रुग्णांकडून अतिरिक्त बिल (Extra hospitals bill) आकारल्याप्रकरणी सहा कोविड रुग्णालयांना (Covid hospital) यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.

Updated: Apr 28, 2021, 10:52 AM IST
जादा बिल आकारल्याने या जिल्ह्यातील 6 कोविड रुग्णांलयाना नोटीस title=
संग्रहित फोटो

 यवतमाळ  : रुग्णांकडून अतिरिक्त बिल (Extra hospitals bill) आकारल्याप्रकरणी सहा कोविड रुग्णालयांना (Covid hospital) यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून 48 तासात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. खासगी कोविड हॉस्पीटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांकडून मनमानी बील घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयात ऑडीटर नियुक्त केले आहे. या ऑडीटरांनी बिलांच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. (Extra bill: Notice to 6 Covid hospitals in Yavatmal)

यात धवणे हॉस्पीटल, यवतमाळ कोव्हीड केअर सेंटर, उजवणे हॉस्पीटल, क्रिटिकेअर हॉस्पीटल, राठोड इन्टेंसिव्ह केअर युनीट आणि महालक्ष्मी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. रुग्णालयांचे उत्तर समाधानकारक नसल्यास वसुलीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

खासगी कोविड रुग्णालयात ( Covid hospitals) प्रशासनाने नेमलेल्या ऑडीटरमार्फत दैनंदिन भरती होणाऱ्या रुग्णांची माहिती घेणे, रुग्णालयातील उपलब्ध बेड संख्या, ॲक्टिव्ह रुग्ण, पॉझिटिव्ह रुग्ण, सुट्टी देण्यात आलेले रुग्ण यांची अद्ययावत माहिती ठेवणे, कोरोनाबाधित रुग्णांकडून शुक्ल आकारणी होते किंवा नाही याची पडताळणी करणे, तसेच परिपत्रकानुसार शुल्क आकारणी होत नसल्यास एकंदरीत बिलाची तपासणी करुन शुल्क आकारणी निश्चित करण्यात येणार आहे.

रुग्णालयातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णांचे देयके तपासल्याशिवाय त्यांची सुटका होणार नाही, याची खात्री करणे, कोरोनाबाधित रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून जादा रक्कम घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तेथेच त्यांच्या तक्रारींचे निरसन करणे, तसेच याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सादर करणे आदी कार्यवाही करण्यात येते.