Osho Ashram : आचार्य ओशो रजनीश यांच्या 33 व्या पुण्यतिथीवरुन सध्या चांगलाच गोंधळ सुरु आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ओशो भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखले. यामुळे ओशो भक्तांनी पुण्यात आंदोलन केले. पुण्यातील ओशो आश्रमात (Osho Ashram) तणाव निर्माण झाला होता. गेट तोडून भक्तांनी आश्रमात प्रवेश. ओशो भक्तांवर पोलिसांनी लाठीमार देखील केला. या सगळ्या घडामोडींमुळे ओशो पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'संभोग से समाधि की ओर'... या पुस्तकामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की ओशोंच्या आश्रमात नेमकं चालायचं काय?
ओशो आश्रमात आज भक्तांवर लाठीमार करण्याची वेळ पोलिसांवर आली. ओशो आश्रमाचे गेट तोडून भक्त आश्रमात शिरले. कोरेगाव पार्क परिसरात ओशोंचे आश्रम आहे. ओशोचा संबोधी दिवस साजरा करण्यावरुन गोंधळ उडाला. सर्व भक्तांना माळेसह सोडण्यास नकार दिल्याने भक्तगण संतापले. अखेर भक्तांनी गेट तोडून आत प्रवेश मिळवला. त्य़ानंतर ओशो आश्रमाबाहेर पोलिसांची गर्दी झालीय. पोलिसांनी अनेक भक्तांना ताब्यात घेतलंय. तर अनेकांवर लाठीमार केला.
70 च्या दशकातील सुपरस्टार विनोद खन्नानं गुरु ओशोला शरण जाऊन सर्वांना चकित केले होते. यानंचर त्यांचा मुलगा साक्षी खन्ना याने देखील आपल्या वडिलांच्या पाउलावर पाउल ठेवले. साक्षीने अध्यात्मिकतेचा रस्ता पकडून ओशो इंटरनेशनल जॉइन केल आहे.
अध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांचे मृत्यूपत्र देखील चर्चेत आले. ओशो रजनिश यांचं खोट मृत्यूपत्र बनवून ट्रस्टनं कोट्यवधी रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप ओशोंचे निकटवर्तीय आणि याचिकाकर्ता योगेश ठक्कर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.
'संभोग से समाधि की ओर'... या पुस्तकामुळे खळबळ उडाली होती. 1979 मध्ये हे पुस्तक आले होते. यामुळे ओशोंच्या आश्रमात अशा प्रकारची शिकवण दिली जायची का असा प्रश्न उपस्थित झाला. ओशो आश्रमात अनुयायांना भगवानांचं `दर्शन` घेण्याची तसेच त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष एकांतात संवाद साधण्याची संधी देखील असायची अशी देखील चर्चा आहे. ओशो यांना सेक्स गुरु म्हणून देखील ओळखले जायचे. जगभरात ओशोंचे लाखो अनुयायी आहेत.