'...तर माझंही प्रमोशन होणार'

जर केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांचे प्रमोशन झाले तर माझेही प्रमोशन होईल' असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं.

Updated: Jun 4, 2017, 08:40 PM IST
'...तर माझंही प्रमोशन होणार' title=

नागपूर : जर केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांचे प्रमोशन झाले तर माझेही प्रमोशन होईल' असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं. नागपुरात सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे आयोजित 'राष्ट्रीय वयोश्री योजना' निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी चर्चेत आहे. अशात रामदास आठवले यांच्या या विधानानं सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान, केंद्रातील सत्तारूढ एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.