लोणावळा : लोणावळ्यातल्या अॅम्बी व्हॅलीच्या लिलावात अडथळे आणल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं सहाराची कानउघडणी केल्याचे वृत्त आहे. सहाराच्या लिलावामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं पुणे पोलिसांना आले होते.
यासंदर्भात सेबीनं तक्रार केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं या पत्राची गंभीर दखल घेतलीय. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी पुढच्या ४८ तासांत हायकोर्टाच्या समापकाला ही मालमत्ता हस्तांतरीत होईल याकडे लक्ष देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
तसंच ही लिलाव प्रक्रिया थेट सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सुरू आहे. त्यामुळे कुणीही या प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर कोर्टाचा अवमान मानण्यात येईल आणि त्याची रवानगी थेट जेलमध्ये करण्यात येईल असा सज्जड इशाराच सुप्रीम कोर्टानं दिला आहे. तसेच अॅम्बी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टानं समापकाला दिले आहेत.