पुणे : धरणक्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंवड शहराच्या पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये २४.३१ टीएमसी म्हणजेच ८३.३९ टक्के इतका पाणीसाठा आहे.
गेल्यावर्षी धरणांमध्ये १८ टीएमसी म्हणजेच ६१.७४ टक्के इतका पाणीसाठा होता. पुणे शहराला वर्षभरात १४ ते १५ टीएमसी पाणी लागते. धरणांतील पाणीसाठा पुढील काळात २८ ते २९ टीएमसीवर जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे उर्वरित पाण्याचे ग्रामीण भागासाठी उपलब्धतेनुसार नियोजन करण्यात येणार आहे. यावर्षी पाणीसाठा चांगला असला तरी नियोजन मात्र काटेकोर करावं लागणार आहे.