चंद्रपूर भद्रावतीनगर पालिकेची निवडणूक १९ ऑगस्टला

चंद्रपुरात भद्रावतीनगर पालिकेची निवडणूक येत्या १९ ऑगस्टला होतेय. १३ प्रभागातील २७ जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात आहेत.

Updated: Aug 14, 2018, 05:06 PM IST
चंद्रपूर भद्रावतीनगर पालिकेची निवडणूक १९ ऑगस्टला title=

चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावतीनगर पालिकेची निवडणूक येत्या १९ ऑगस्टला होतेय. १३ प्रभागातील २७ जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीसाठी ८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. १९९७ साली या शहरात नगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून २००८ पर्यंत शिवसेनेने भाजपला सोबत घेत सत्ता कायम ठेवली. यानंतर शिवसेनेने भाजपच्या कुबड्या दूर सारत एकहाती सत्ता मिळवली. 

गेल्या २० वर्षांपासून नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेला सत्तेतून दूर सारण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंतची सगळी सूत्रं आपल्या हाती घेतलीत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही शिवसेनेला सत्तेपासून दूर सारण्यासाठी कंबर कसलीय. तर २० वर्षांपासूनची सत्ता कायम ठेवू असा विश्वास शिवसेनेचे मावळते नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी व्यक्त केलाय.