शेजाऱ्याने केलेला अपमान जिव्हारी लागला, पुणेकर आजोबांनी स्वतःचं आयुष्य संपवलं

Pune Man Suicide: पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजाऱ्याने केलेला अपमानामुळं निराश झालेल्या आजोबांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 30, 2023, 12:36 PM IST
शेजाऱ्याने केलेला अपमान जिव्हारी लागला, पुणेकर आजोबांनी स्वतःचं आयुष्य संपवलं title=
Elderly man allegedly jump off on bridge died in pune

Pune Crime News: स्पीकरवरून निर्माण झालेला वाद एका ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर बेतला आहे. (Elderly man Suicide) या सर्व वादातून अपमानित झाल्याने एका ७० वर्षीय नागरिकाने स्वतःच आयुष्य संपवलं आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yeravada Police Thane) हद्दीत हा सर्व प्रकार घडला असून याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. 

ज्येष्ठ व्यक्तीने टोकाचा निर्णय घेतला

ज्ञानेश्वर साळुंखे (वय 70, रा. नवी खडकी) असे आयुष्य संपवलेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे (वय 47) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चेतन बेले (वय 26), देवेश ऊर्फ नन्या पवार (वय 18), यश मोहिते (वय 19), शाहरुख खान (वय 26), जय तानाजी भडकुंभे (वय 22) या 5 जणांना अटक केली आहे. हा सर्व प्रकार नवी खडकी येथे 28 मेच्यारात्री घडला आहे.

नाशिकः दार उघडताच समोर दिसले हादरवणारे दृश्य; आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच....

स्पीकरच्या आवाजाने वैतागलेले

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी साळुंखे यांच्या घराशेजारी चेतन बेले राहतात. त्यांच्या घरात हळदीचा कार्यक्रम सुरू होता. स्पीकर लावल्यामुळे त्याठिकानी मोठा गोंधळ सुरू होता. स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज करु नका, आम्हाला त्रास होतो असे सांगितले. 

आरोपीने अपमानित केले

यावरून आरोपींनी त्यांना अपमानित केले आणि तिथून हाकलून दिले. त्यानंतरही बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे साळुंखे पुन्हा त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करा असे सांगत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या घरातील लोक त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली. चेतन बेले याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. त्यांनी फिर्यादी हे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी यांनी पुन्हा फिर्यादीचे वडिल ज्ञानेश्वर साळुंखे यांनी मारहाण केली. 

२ वर्षांपूर्वी झाला होता एन्काउंटर, आता कबरीतून मृतदेह गायब, सत्य कळताच पोलिस हादरले 

अपमान सहन न झाल्याने धक्कादायक कृत्य

मारहाणीमुळे होणार्‍या वेदना व अपमान सहन न झाल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या या कृत्यामुळं कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.