एक फूल, दोन हाफ! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस... उद्धव ठाकरे यांचा एका वाक्यात तिघावंर प्रहार

असतानाही राष्ट्रवादी का चोरली, पक्ष संपवण्याची वृत्ती मोडून काढावी लागेल. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. आता मतपेटीतून नव्हे, खोक्यातून सरकारचा जन्म होतो. असा घणाघात ठाकरेंनी दिग्रसमधील सभेत केला.

Updated: Jul 9, 2023, 06:47 PM IST
एक फूल, दोन हाफ! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस... उद्धव ठाकरे यांचा एका वाक्यात तिघावंर प्रहार title=

Uddhav Thackeray : राज्यातील राजकीय घडामोडीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे विदर्भ दौ-यावर आहेत. उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीचं दर्शन घेऊन विदर्भाच्या दौ-याला सुरूवात केली.  पोहरादेवीत दाखल होताच त्यांचं बंजारा समाजाच्या परंपरेनुसार पारंपरिक वाद्य आणि नृत्य करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एका दगडात तीन पक्षी मारले आहेत. एक फूल, दोन हाफ... असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  नव निर्वाचीत उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांवरही हल्लाबोल केला आहे. 

...तर भाजप कार्यकर्त्यांना आता सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या

एक फूल दोन हाफ आहात. मुख्यमंत्री फुल आहेत की नाही माहित नाही. पण, दोन हाफ मुख्यमंत्री आहेत. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबतचं वचन पाळलं असतं तर भाजप कार्यकर्त्यांना आता सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या असा टोला ठाकरेंनी लगावलाय.आमचं तीन चाकंच सरकार होत. यांच सरकार लगेच त्रिशूळ झाले.  

आधी शिवसेना पक्ष फोडला. आता राष्ट्रवादी पक्ष  फोडला. भक्कम बहुमत असताना राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांना केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यानंतर मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप करणा-यांचाच सरकारमध्ये  घेतले आहे.  एक देश, एक पक्ष कदापी मान्य नाही. आम्ही गेले काँग्रोससोबत, कारण तुम्ही आम्हाला सोडून दिले.  मेहबुबा मुफ्ती, राष्ट्रवादी अशा कुणासोबतही भाजप जाऊ शकते. मात्र, आम्ही कुणासोबत जायचंच नाही का? 

भावना गवळी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

बहुमत सोबत असतानाही राष्ट्रवादी का चोरली, पक्ष संपवण्याची वृत्ती मोडून काढावी लागेल. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली  आमदार, खासदार गेले तरी दमदार कार्यकर्ते सोबत असल्याचा टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांकडून मोदींनी राखी बांधली असा घणाघात त्यांनी खासदार भावना गवळींवर केला.

येथील खासदार पळून गेल्या. नंतर त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधतानाचे फोटो व्हायरल झाले. भावना गवळी यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांची भावना गवळी यांच्यावर टीका. कर्नाटकमध्ये बजरंगबलीने भाजपच्या डोक्यात गदा घातली. तसंच महाराष्ट्रातही घडले पाहिजे.   

मी मणीपूर शांत करण्याचा तोडगा देतो. अधिकाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर ED, CBI मणीपूरमध्ये पाठवा. खासदार, आमदार गेले तरी दमदार शिवसैंनिक माझ्या सोबत आहेत. पोहरादेवीचा आराखाडा मंजूर झाला. निधी देखील देण्यात आला. मात्र, मंदिर सोडा पोहरादेवी पर्यंतचा रस्ता देखील तयार झालेला नाही असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.