'ते ब्राम्हण असल्याने भविष्य खरे ठरतील असे वाटत होतं, पण...'; खडसेंची फडणवीसांवर बोचरी टीका

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे जळगाव येथे आयोजित एका रक्तदान शिबिरात बोलत होते.

Updated: Apr 18, 2021, 03:55 PM IST
'ते ब्राम्हण असल्याने भविष्य खरे ठरतील असे वाटत होतं, पण...'; खडसेंची फडणवीसांवर बोचरी टीका title=

जळगाव : देवेंद्र फडणवीस यांना अलीकडे काय झालं माहिती नाही. मात्र सत्ता गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस माशासारखा तडपत आहे. सत्ता कधी येणार म्हणून रात्री झोपेतही दचकून उठत असेल, सत्ता गेल्यानंतर हे सर्व अस्वस्त झाले आहेत. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.ते जळगाव येथे आयोजित एका रक्तदान शिबिरात बोलत होते.

 महाविकास आघाडी सरकार पडणार आहे असे अनेक भाकीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवले . ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांचे भविष्य खरे ठरतील असे वाटत होतं. मात्र त्यांचे तर भविष्य दर वेळी खोटे ठरायला लागले.

हे सरकार पडणार नाही. जरी हे सरकार पडले तरी राष्ट्रपती राजवट लागू होईल. तसे झाल्यास पुन्हा आठ दिवसात आम्ही 171 आमदार उभे करू, अशी असे खडसे यांनी म्हटले आहे.

भाजपचे काही आमदार त्यांच्यावर नाराज आहेत. नाथाभाऊ दिवसा भाजपातून गेले तसे नाराज आमदार भाजपातून जाऊ नये, यासाठी थांबरे आपले सरकार येत आहे असा प्रकार सुरु असल्याचेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.